अकोला (प्रतिनिधी) : आय.एम.ए. द्वारा राज्यभर आयोजीत महास्पोर्ट गेल्या महिन्यात आयोजीत केल्या गेला होता. महास्पोर्ट च्या उत्कृष्ट आयोजनाचा पुरस्कार अकोला महास्पोर्ट आयोजन समिती चे अध्यक्ष डॉ विनीत हिंगणकर यांना नुकताच हॉटेल ओबेरॉय मुंबई येथे संपन्न झालेल्या दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.डॉ विनीत हिंगणकर यांनी पुन्हा एकदा अकोल्याचा मान राज्यात उंचावला असून उत्कृष्ट आयोजनातून आपल्या कल्पक व सर्वसमावेशक नेतृत्वगुणांचा परिचय राज्याला करून दिला आहे. आय.एम.ए. द्वारा राज्यभर “महास्पोर्ट” सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते.अकोल्यात सिटी स्पोर्ट्स क्लब अकोला येथे हा महाराष्ट्र स्तरीय दिमाखदार सोहळा उत्साहात संपन्न झाला होता.या सोहळ्याच्या आयोजन समिती चे अध्यक्ष होते अकोला येथील सुप्रसिद्ध ओझोन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक, प्रख्यात बधीरीकरण तज्ञ डॉ विनीत हिंगणकर.
आय.एम.ए. च्या या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक सोहळ्यात महाराष्ट्र भरातून मोठया संख्येने डॉक्टर्स सहभागी झाले होते.
सायकलिंग,स्विमिंग,मॅरॉथॉन,बॅडमिंटन,कॅरम ई सह नऊ क्रीडा प्रकारांचा या भव्य महास्पोर्ट कार्यक्रमात समावेश होता.
डॉ विनीत हिंगणकर सर हे स्वतः उत्कृष्ट स्पोर्टसमन असून सायकलिंग,रनिंग,मॅरॉथॉन,क्रिकेट आदी क्रीडाप्रकारांमध्ये त्यांनी आपल्या खिलाडूवृत्ती व चिकाटीचा परिचय अनेकदा दिलेला आहे.
नुकताच पोळ्याच्या दिवशी अकोला ते आपले मुळगांव अकोट तालुक्यातील कालवाडी पर्यंतचा प्रवास सायकलवर करून शेतकरी व गावकऱ्यांशी संवाद साधला होता.
निष्णात बधीरीकरण तज्ञासोबतच, खिलाडूवृत्ती, माणुसकी,नेतृत्वगुण,सामाजीक बांधिलकी चा परिचय देणारे डॉ विनीत हिंगणकर यांनी आपल्या ज्ञानाच्या, कौशल्याच्या,चिकाटीच्या जोरावर संपूर्ण वऱ्हाड ला अभिमान वाटावा असे अद्यावत ओझोन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,विदर्भातील अग्रनामांकीत निशांत सेल्स,सचिन एंटरप्रायजेस या सह वैद्यकीय व औषधी क्षेत्रामध्ये अद्यावत,वाजवी,निष्णात सेवा वऱ्हाडातील जनतेला उपलब्ध करून दिल्यात सोबतच साडेचारशे कुटुंबांना या सेवांच्या माध्यमातून कौशल्यानुरूप चांगला रोजगार ही अकोल्यात उपलब्ध करून दिला.अनेक गरजू रुग्णांना,गोरगरीब कुटुंबाना, विद्यार्थ्यांना ठोस व खंबीर मदतीचा हात देण्यासोबतच विविध सामाजीक उपक्रमांमध्ये डॉ.विनीतदादा हिंगणकर आघाडीवर असतात. अशा या माणुसकीचा ओलावा जपणाऱ्या निष्णात तज्ञाचे,कुशल नेतृत्वाचे कर्तृत्व अभिमान वाटावा असेच आहे.
अधिक वाचा : 27 नोव्हेंबर पासून अकोला जिल्ह्यात गोवर व रूबेला एकत्रित लसीकरण मोहीम आयोजित
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola