पातूर (सुनील गाडगे)- पातूर तालुक्यातील ग्राम मळसुर येथील अल्पभूधारक शेतकरी स्व. श्रीराम जानुजी घोगरे या शेतकऱ्याने 15 जुलै रोजी शेतीला लागणारा खर्च व त्यातून मिळणारे तुटपुंजे उत्पन्न यामुळे आलेला कर्जबाजारीपणा व सरकारच्या आळमूठ्या धोरणाला कंटाळून आपल्या शेतात विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपविली होती. त्यानिमित्याने नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे त्यांनी स्थापन केलेल्या व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांसाठी काम करणाऱ्या “नाम फाऊंडेशन” च्या वतीने त्यांच्या पत्नी वेणूताई श्रीराम घोगरे यांना सानुग्रह मदत म्हणून “नाम फाउंडेशन” चे विदर्भ व खानदेश चे समनवयक हरीश इथापे यांच्या मार्गदर्शनात नाम फाउंडेशन चे अकोला जिल्हा समनव्यक माणीक शेळके यांच्या हस्ते 15 हजार रुपयांचा धनादेश देवुन मदत करण्यात आली. मृतक श्रीराम यांना एक मुलगा असून तो देखील विकलांग आहे त्यामुळे घरातील ते एकटे कमावते असल्याने त्यांच्या जाण्याने उदरनिर्वाहाची मोठी चिंता वेणूताईंना लागली आहे. त्यात नाम फाउंडेशनची हि मदत मिळाल्याने फार आधार झाल्याचे त्यांनी नाम फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांशी बोलतांना सांगितले. यावेळी नाम फाऊंडेशनचे जिल्हा समनव्यक माणीक शेळके, पातूर तालुका समनवयक मंगेश गोळे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरविंदजी महल्ले, चंदुभाऊ महल्ले, शँकर माहुलीकर, किशोर रौदळे,आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक वाचा : संजयभाऊ गाडगे यांच्या वाढदिवसा निमीत्य पातूर येथे जय गुरुदेव मदत केंद्राची स्थापना
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola