पातूर (सुनिल गाडगे) : पातूर येते संजय भाऊ गाडगे यांच्या वाढदिवसा निमित्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कडून प्रेरणा घेऊन समाजातील गरीब व गरजू जनते साठी जुने कपडे ,स्वेटर, चप्पल ,बूट ,अश्या वस्तूंचा लाभ घेता यावा यासाठी जय गुरु देव मदत केंद्राचा शुभारंभ तृष्णा वाटर सर्व्हिसींग सेंटर छत्रपती संभाजी चौक येथे करण्यात आला आहे. या उपक्रमातून गरीब व गरजू लोकांना याचा फायदा होईल याची खात्री आहे अशे उपक्रम संजयभाऊ गाडगे हे नेहमी घेत असतात त्यांच्या या कार्याचे कितीही कौतुक करावं तेवढे कमीच आहे .कारेक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ समाजसेवक रामरावजी माहुलीकर व तिमांडे महाराज होते.सूत्र संचालन छञपतिभाऊ गाडगे यांनी केले तसेच छोटू भाऊ काळपांडे मोहनजी जोशी विलास राऊत सर देवानंदजी गहिले गोपाल गाडगे सर शंकररावजी इनामदार आदी मान्यवर उपस्तित होते.
अधिक वाचा : ईद ए मिलाद निमित्त पातूर पोलीस ठाण्यात शांतता समिती ची बैठक
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola