नवी दिल्ली : भारताची अनुभवी महिला बॉक्सर मेरी कोम ने नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या World Boxing Championship स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 48 किलो वजनी गटात मेरी कोमने उपांत्य फेरीत उत्तर कोरियाच्या किम ह्यांग-मीचा पराभव केला. या कामगिरीसह मेरी कोम एका अनोख्या विक्रमाच्या उंबरठ्यावर उभी आहे.
संपूर्ण सामन्यात मेरी कोमने आपलं वर्चस्व राखलं होतं. दुसऱ्या राऊंडमध्ये मेरी कोमने चपळाईने खेळ करत प्रतिस्पर्धी खेळाडूला बेजार करुन सोडलं. या विजयामुळे मेरी कोमचं World Boxing Championship स्पर्धेत सहावं सुवर्णपदक जिंकण्याचं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आयर्लंडच्या केटी टेलर आणि मेरी कोम यांच्या नावावर World Boxing Championship स्पर्धेची प्रत्येकी 5 सुवर्णपदकं जमा आहेत. यंदाच्या स्पर्धेत पदक मिळाल्यास मेरी केटी टेलरचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा : India vs Australia : भारताचा ४ धावांनी पराभव
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola