अकोला (प्रतिनिधी) : स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत अकोला महानगरपालिकेतील सफाई कामगारांना आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने मनपा उपायुक्त सुमंत मोरे यांच्या हस्ते साहित्याचे वितरण करण्यात आले.
सफाईचे काम करीत असताना कामगारांच्या आरोग्यावर सुरक्षेच्या साधनाअभावी विपरीत परिणाम होतो. हे टाळण्यासाठी सफाई कामगारांना आरोग्य सुरक्षा मानकानुसार हातमोजे, मास्क, जॅकेट घालणे अनिवार्य आहे. याच दृष्टिकोनातून सदर साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी क्षेत्रीय अधिकारी डॉ. दिपाली भोसले, पूनम कळंबे, आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत राजूरकर, शिक्षणाधिकारी डॉ. शाहीन सुल्ताना, बाजार विभाग प्रमुख संजय खराटे, आरोग्य निरिक्षक किरण खंडारे तसेच सफाई कामगारांची उपस्थिती होती.
अधिक वाचा : आदिवासी विभागातील भ्रष्टाचाराविरोधात उपोषण सुरू
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola