मुंबई : ‘संस्कारी बाबूजी’ म्हणून ओळख असलेल्या आलोकनाथ यांच्यावर अखेर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९९० च्या दशकात लोकप्रिय ठरलेली टीव्ही मालिका ‘तारा’च्या निर्मात्या विनता नंदा यांनी त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता.
याप्रकरणी मंगळवारी (२० नोव्हेंबर)ला ओशिवरा पोलिसांनी त्यांच्या विरोधात दखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. मात्र, अद्याप त्यांना अटक केली नाही. विनता यांनी त्यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. तसेच या प्रकरणी पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
आलोक नाथांवर अखेर मंगळवारी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यावर जबरी केल्याप्रकरणी भादवी ३७६(१) आणि ३७७ ही कलमे लावण्यात आली आहेत. #MeToo या मोहिमेअंतर्गत हे प्रकरण पुढे आले होते.
अधिक वाचा :#MeToo : नवाझुद्दीनने बळजबरी मिठी मारली : निहारिका सिंह
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola