अकोला (शब्बीर खान) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील बोडखा चिचखेड गट ग्रामपंचायतमध्ये विविध विकास कामांमध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, यासंदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारी देऊनही कोणतीच कारवाई न करण्यात आल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ता सागर कढोणे आणि उपसरपंच बळीराम लोखंडे व काही सदस्यांनी गुरूवारपासून पंचायत समितीसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. पातूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या बोडखा चीचखेड गट ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करून ग्रामपंचायत सचिव नंदू साळुंखे यांना निलंबित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सागर काढोने यांनी गटविकास अधिकारी यांच्या कडे केली होती मात्र गटविकास अधिकारी यांनी सादर तक्रारीला केराची टोपली दाखवीत प्रकरण दडपले त्या मुळे आज पंचायत समिती समोर सामाजिक कार्यकर्ते सागर काढोने यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे बोडखा चिचखेड गट ग्रामपंचायतमध्ये १४ वा वित्त आयोग, दलित वस्ती,सामान्य फंड या विविध विकासाच्या योजनांमध्ये ग्रामपंचायत सचिवाने मोठया प्रमाणात नियमबाह्य कामे करून भ्रष्टाचार केल्याचा सामाजिक कार्यकर्ता सागर कढोणे आणि उपसरपंच बळीराम लोखंडे व काही सदस्यांचा आरोप आहे.
या विविध विकासकामांची कामे प्रत्यक्षात न करता ती केवळ कागदावरच करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. या भ्रष्टाचारासंदर्भात यापूर्वीच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गट विकास अधिकारी यांना लेखी स्वरूपात तक्रारी देण्यात आल्या आहेत. परंतु अजूनही त्या तक्रारींची दखल घेण्यात आलेली नाही आणि संबंधितांवर कारवाई करण्यात आलेली नाही, त्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करून ग्रामपंचायत सचिवाला निलंबित करण्यात यावे आणि शासकीय योजनांच्या कामात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करीत सामाजिक कार्यकर्ता सागर कढोणे आणि उपसरपंच बळीराम लोखंडे व काही सदस्यांनी गुरूवारपासून पातूर पंचायत समितीसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या संदर्भात ग्राम सचिव साळुंखे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण कुठलेही काम नियमबाह्यरित्या केले नसून चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे असे ते म्हणाले.
अधिक वाचा : नोटाबंदी विरोधात अकोल्यात काँग्रेसचे धरणे आंदोलन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola