अकोला (प्रतिनिधी) : सरकारने काळा पैसा परत येईल, म्हणून नोटाबंदी करुन जनतेला मूर्ख बनवल्याची टीका काँग्रेसने केली आहे. नोटाबंदीच्या निर्णयाला २ वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. काँग्रेस जिल्हाध्यक्ष हिदायात पटेल यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
केंद्रातील भाजप सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदी केली होती. या बंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था खराब झाली आहे. नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था सुरळीत होईल, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले होते. नोटबंदीच्या निर्णयाला २ वर्ष पूर्ण झालीत. त्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागला. त्याच्या निषेधार्थ काँग्रेसने धरणे आंदोलन केले.
व्यापाऱ्यांची व्यापार करण्याची इच्छा राहिली नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. मजुरांना रोजगार नाही. या अधोगतीला भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष हिदायात पटेल यांनी केला आहे. यावेळी महानगराध्यक्ष बबन चौधरी, मनपा विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण, महेंद्र गवई यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
अधिक वाचा : शिवसेना नेते आदित्य ठाकरे १९ नोव्हेंबर ला अकोल्यात दाखल
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola