अकोला (शब्बीर खान) : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे याबाबत राज्यशासन नेहमीच सकारात्मक राहिले असून मागासवर्ग आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या संदर्भात चित्र स्पष्ट होईल. हा अहवाल १५ नोव्हेंबरपर्यंत येणे अपेक्षीत होते त्याची पूर्तता झाली असून, पुढील पंधरा दिवसात या अहवालाची वैधानिक कार्यवाही पूर्ण केली जाईल.
![मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस](https://ourakola.com/wp-content/uploads/2018/11/मुख्यमंत्री-देवेंद्र-फडणवीस-300x197.jpg)
पुढील पंधरा दिवसात आरक्षणाचा मुद्दा निकालात निघेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
अकोला जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळ व विविध विकासकामांच्या आढावा बैठकीसाठी ते बुधवारी अकोल्यात आले होते. बैठकीनंतर नियोजन भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल अद्यापपावेतो सरकारकडे पोहोचलेला नाही. या अहवालाच्या संदर्भात प्रसार माध्यमांमध्ये विविध वृत्ते झळकली आहेत. अहवालात काय शिफारसी असतील याचा अंदाज घेताना अनेकांनी अहवालच हाती लागल्यासारखी मांडणी केली असून, ही केवळ पंतगबाजी आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल फुटलेला नाही असा दावा त्यांनी केला. हा अहवाल शासनाकडे सादर झाल्यानंतर त्यासदंर्भातील वैधानिक कार्यवाही पुर्ण करून तो अहवाल सार्वजनिक करायचा की नाही याबाबत निर्णय घेऊ असे ही ते म्हणाले.
अधिक वाचा : महापौरांनी अचानक केली शहरातील अतिक्रमणांची पाहणी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola