अकोला (प्रतिनिधी) : अकोला शहरात सोमवारी अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. सिटी कोतवाली ते जैन मंदिर रोडवरील अतिक्रमित गाड्या तोडण्यात आल्या. चौपाटीवरील गाड्या व अतिक्रमित दुकानासमोरील ओटे तोडण्यात आले.
ओपन थिएटर ते फतेह अली चौक रोडवरील अतिक्रमित गाड्या तोडण्यात आल्या. त्यानंतर निशांत टॉवर समोरील अतिक्रमणधारक वानखडे यांचा सेल तसेच इतर लोकांनी म.न.पा.ची परवानगी न घेता थाटलेली दुकानेही हटविण्यात आली. अतिक्रमणधारक मेश्राम यांनी म.न.पा.ची परवानगी न घेता टिन शेड उभारले आहे. त्यांनी शेड काढण्यासाठी मुदतीची विनंती केली. त्यांची विनंती मान्य करीत त्यांना शेड काढण्यासाठी मुदत देण्यात आली.
सदर कार्यवाही मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या आदेशावरुन विभाग प्रमुख नरेंद्र घनबहादुर, सहायक अतिक्रमण अधीक्षक प्रवीण मिश्रा, विजय कडोणे, प्रवीण इंगोले, संजय थोरात, नरेश बोरकर, सुरक्षा रक्षक सैय्यद रफिक, गोपणारयण, विनोद वानखडे, डोंगरे, बामनेट, वी.आर. अरबट, विकास नाकट, विवेक हिंगणकर, विठ्ठल ठाकरे यांनी केली.
अधिक वाचा : हॉकीचे मैदान, विज्ञान केंद्र आणि बालसुरक्षेला प्राधान्य : पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola