अकोला : राजकरणात जनतेचा सेवक म्हणून काम करायचे असून, महाराष्ट्रात अकोला जिल्ह्याला सर्वच क्षेत्रात परिपूर्ण बनविण्याचे ध्येय आहे. सांस्कृतिक शैक्षणिक , आरोग्य , क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याला विकासाच्या उंचीवर न्यायचे आहे. शहरात हॉकीचे मैदान, विद्यार्थांसाठी विज्ञान केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. विज्ञान केंद्र साठी जागेचा शोध सुरु आहे. लवकरच विज्ञान केंद्र सुरु राहील. तसेच बालसुरक्षेला प्राधान्य देण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिली.
पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून साजरी करण्यात येते. यादिवशी पालक मंत्र्यांनी शहरातील निवडक शाळांमधून आलेल्या चिमुकल्या विद्यार्थांसोबत दोन तास मुक्त संवाद साधला. आणि विद्यार्थांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी विद्यार्थांनी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे बालपण, शिक्षण, वैद्यकीय सेवा तसेच राजकरणासोबत त्यांचे जिल्ह्याच्या विकासा विषयीचे व्हिजन जाणून घेतले.
सांस्कृतिक, शैक्षणिक , आरोग्य , क्रीडा दृष्टीकोनातून अकोला शहर आणि जिल्हा अग्रेसर राहावे, यासाठी कोणत्या योजनांची अमलबजावणी करण्यात येत आहे, याविषयी सुद्धा विद्यार्थांनी त्यांना प्रश्न विचारले.
पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी मी शहराच्या विकासाबद्दल कटिबद्ध आहे, शहराचा सांस्कृतिक, शैक्षणिक , कृषी आणि सामाजिक विकास व्हावा, यासाठी शासनाच्या विविध योजनांची अमलबजावणी सुरु असल्याचे विद्यार्थांना सांगितले.
अधिक वाचा : पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी साधला शेतकऱ्यांसोबत संवाद!
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola