अकोला: निसर्गाच्या लहरीपणामुळे दिवसेंदिवस कठीण होत चाललेल्या शेतीत टिकून राहायचे असेल, तर शेतकºयांनी गटशेतीच्या माध्यमातून शेतीपूरक उद्योगांची कास धरावी आणि आपला आर्थिक विकास साधावा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले.
कापशी येथे शनिवार, १0 नोव्हेंबर रोजी त्यांनी शेतकऱ्यानंसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी कापशी येथील स्वयंभू गणेश शेतकरी बचत गटाच्या विविध लघू उद्योगांना भेटी दिल्या आणि उद्योगांची माहिती जाणून घेतली. यामध्ये यंत्राद्वारे तयार करण्यात येणाऱ्या गरम मसाला उद्योग, मिनी दालमिल, पेढा उद्योग, लिंबू व लोणचे उद्योगासोबतच इतर लघू उद्योगांची पाहणी केली आणि शेतीला जोड देऊन लघू उद्योग उभा करून प्रगती साधणाºया शेतकऱ्यानंचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी कौतुक केले आणि कापशी परिसरातील शेतकºयांकडून इतर शेतकऱ्यानी प्रेरणा घ्यावी, असे मत व्यक्त केले.
पालकमंत्री डॉ. पाटील यांनी कापशी तलाव येथील जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची पाहणी केली. स्वयंभू गणेश गटाने कमीत कमी पाण्याचा वापर करून सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेल्या पपई बागेला भेट दिली. यावेळी गटाचे अध्यक्ष पुरु षोत्तम चतरकर, डॉ. संजय धोत्रे, प्रकाश चतरकर, शरद झामरे, गोपाल राऊत, वसंतराव चतरकर, बळवंत आमले, बाळू फेंड, कन्हैया यादव, पुरु षोत्तम उमाळे, पिंटू कोकाटे, गजानन डिवरे, संतोष चतरकर, शांताराम रोकडे, प्रल्हाद गुडधे, परशराम दांदळे, विश्वनाथ खंडारे, राम चतरकर, अंबादास जाधव, संजय राऊत, नरेंद्र पांडव, गजानन चतरकर, प्रदीप चतरकर, श्रीराम पांडव, प्रशांत टाले, नीतेश बराटे, गजानन लाहुडकार, बळीराम टाले, अमोल काळे, गोपाल चतरकर, संतोष नेरकर, मंगेश पाटेखेडे, नितीन गुडधे, संतोष ताले, विद्याधर बराटे, दत्ता ढोरे, गजानन इंगळे, सुनील पाटील, राजेंद्र टाले, अमोल डोंगरे, राजेश खंडारे, विजय टाले, सदानंद ढोंबळे, देवीदास उगले, नारायण लेंभाडे, विठ्ठल चतरकर, प्रवीण चतरकर, संतोष चतरकर आदी शेतकरी उपस्थित होते.
अधिक वाचा : कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या ५७ उंटांना जीवनदान
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola