छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी पुन्हा एकदा सुरक्षा दलांना निशाणा केले. बिजापूरपासून काही अंतरावर नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात सीमा सुरक्षा दलाचे ४ जवान तसेच इतर दोघेजण या हल्ल्यात जखमी झाले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अद्याप सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्यावेळीही बिजापूरमध्ये सीआरपीएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील बिजापूरपासून ७ किलोमीटर अंतरावर आयईडी स्फोट झाला. यामध्ये सीमा सुरक्षा दलाचे ४ जवान, एक डीआरजी आणि एक सामान्य नागरिक जखमी झाले. सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी बिजापूर येथील रुग्णालयात हालवण्यात आले. नक्षलविरोधी अभियानाचे डीआयजी पी. सुंदरराज यांनीही हल्ला झाल्याचे सांगितले.
अधिक वाचा : गैरवर्तनाच्या आरोपांनंतर Flipkart सीईओ बिन्नी बन्सल यांचा राजीनामा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola