नवी दिल्ली: फ्लिपकार्टचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बिन्नी बन्सल मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. बिन्नी बन्सल यांच्यावर वैयक्तिक गैरवर्तनाचा आरोप असून या प्रकरणी त्यांची चौकशी सुरु होती.
त्यांच्यावर अशाप्रकारचे आरोप का करण्यात आले होते, याची नेमकी माहिती अजूनपर्यंत मिळालेली नाही. परंतु, फ्लिपकार्ट आणि वॉलमार्टकडून त्यांच्यावरील या आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी सुरु असल्याचे वॉलमार्टने सांगितले. गेल्यावर्षी वॉलमार्टने फ्लिपकार्ट कंपनीचे ७७ टक्के समभाग खरेदी केले. यानंतर फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन बन्सल लगेचच कंपनीतून बाहेर पडले होते.
प्राथमिक माहितीनुसार, चौकशीदरम्यान बिन्नी बन्सल यांच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही. मात्र, त्यांनी काही निर्णय घेताना नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. बिन्नी यांनी पुरेशी पारदर्शकता न ठेवता काही निर्णय घेतले. त्यामुळे आम्ही त्यांचा राजीनामा स्वीकारल्याचे वॉलमार्टने सांगितले.
अधिक वाचा : अंबरनाथ मध्ये रॉकेल प्यायल्याने चिमुकल्याचा मृत्यू
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola