अकोला (शब्बीर खान) : मलकापूर परिसरातील १७ वर्षीय युवतीला मध्यप्रदेश मध्ये एक लाखात विकून तिचा खोटी कागदपत्रे दाखवून विवाह केल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली. खदान पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मलकापूरमधील ४५ वर्षीय व्यक्तीने १६ जानेवारी रोजी तक्रार दाखल केली होती. यामध्ये मुलीला पळवून नेल्याच्या फिर्यादीवरून खदान पोलिसांनी कलम ३६३ भादंविनुसार गुन्हा दाखल केला होता. या घटनेची सुरुवात खदान पोलिस स्टेशनच्या हद्दीतून झाली होती.तिला मध्यप्रदेशात विकण्यात आले होते. मलकापूर परिसरात राहणाऱ्या एका मुलीला तिच्या पित्याने काही महिन्यांपूर्वी गौरक्षण मार्गावरुन घराकडे जाणाऱ्या ऑटोरिक्षात बसवून दिले. त्यानंतर ते पाटबंधारे कार्यालयाकडे कामानिमित्त निघून गेले. काम आटोपल्यानंतर ते संध्याकाळी घरी परतले; मात्र मुलगी घरी आली नसल्याचे त्यांना समजले. त्यांनी तिचा परिसरासह नातेवाईक, परिचितांकडे शोध घेतला; मात्र मुलीचा शोध लागला नाही. अखेर त्यांनी थेट खदान पोेिलस स्टेशनला धाव घेत मुलीला पळवून नेल्याप्रकरणी तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरु केला.
दरम्यान काही दिवसांंपूर्वी ती मुलगी घरी परतली. तिने कुटुंबीयांसह पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या विविध कलमांसह, पोस्को अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखला केला. दरम्यान, बालकल्याण समितीकडून मुलीचा जबाब नोंदविण्यात आला. याप्रकरणात शिवणी येथील रिता सिरसाठ, ज्ञानेश्वर सिरसाठ, चंदा राठोड, मुकेश राठोड यांची नावे पुढे आली. तिला लग्नासाठी मध्यप्रदेश येथील दलाल कालुराम, आशा व विक्रम यांच्या मदतीने विष्णुलाल पोरवाल, पन्नालाल पोरवाल, व शोभा पोरवाल यांना विकण्यात आले. हा व्यवहार एका लाखात निश्चित झाला होता. यासाठी तिच्या वयाचे खोटे कागदपत्रेही तयार केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. याप्रकरणी पोलिसांनी लता उर्फ रिता संतोष इंगळे, संतोष रामधन इंगळे, चंदा मुकेश राठोड व मुकेश ज्ञानदेव राठोड यांना अटक केली आहे. त्यांची १३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. सदर मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले, की शिवणी येथे राहणाऱ्या रिता सिरसाठ, ज्ञानेश्वर सिरसाठ, चंदा राठोड आणि मुकेश राठोड यांनी कटकारस्थान करून तिला मध्यप्रदेशमध्ये नेले.
तेथील दलाल कालुराम, आष्ठा व विक्रम यांच्या मदतीने विष्णुलाल पोरवाल, पन्नालाल पोरवाल, शोभा पोरवाल यांना आपल्याला एक लाख रुपयात विकले. तसेच खोटे दस्तऐवज तयार करून कोर्टात विष्णुलाल पोरवाल याच्याशी लग्न लावून दिले. त्यांनी तिच्यासोबत लैंगिक संबंध प्रस्थापित केले. तसेच रिता सिरसाठ हिने पीडितेस संतोष इंगळे, नेहा इंगळे यांच्या दुसऱ्या घरी विकण्यासाठी ठेवले होते, असा जबाब पीडितेने दिल्याने या प्रकरणी पोलिसांनी भादंविच्या कलम ३६६, ३६६ (अ), ३६८, ३७० (अ), ३७६, १२ नुसार गुन्हा दाखल करुन त्यात पास्कोप्रमाणे कलम वाढविण्यात आले. या प्रकरणी आरोपी लता ऊर्फ नेहा संतोष इंगळे (२६), संतोष रामधन इंगळे (३२), चंदा मुकेश राठोड (३०), मुकेश ज्ञानदेव राठोड (३२) सर्व रा. शिवणी यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी खदान पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करीत आहेत.
अधिक वाचा : पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी साधला शेतकऱ्यांसोबत संवाद!
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola