अकोला (शब्बीर खान) : राजस्थानातून हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या ५७ उंटांना पातूर पोलिसांनी १२ नोव्हेंबर रोजी जीवनदान दिले. उंटाच्या तस्करी प्रकरणात तीन राज्यातील रॅकेट सक्रीय असल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. राजस्थान येथून ५० ते ६० उंटांना कत्तलीसाठी हैदराबाद येथे नेण्यात येत असल्याची माहीती पातूर पोलिसांना मिळाली. या उंटांना राजस्थान येथून बाळापूर, पातूर मार्गे वाशिम तेथून हैदराबाद येथे नेण्यात येत होते. याविषयी माहिती मिळताच पोलिसांनी उंटाचा काफीला पातूरजवळ थांबवनू ५७ उंटांना जीवनदान दिले. उंटाच्या तस्करीचे रॅकेट तीन राज्यात सुरू असल्याचे या कारवाईवरून स्पष्ट होते. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. वृत्त लिहीस्तोवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती.
अधिक वाचा : विनाकारण मारहाण करून खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या ठाणेदाराविरोधात कारवाई करा महिलांनी केले एकदिवसीय धरणे आंदोलन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola