अकोला (शब्बीर खान) : अकोला रामदास पेठ पोलिस स्टेशनचे ठाणेदार शैलेश सपकाळ यांनी २ नोव्हेंबर २०१८ रोजी खंगर पूरा येथील रहिवासी हारिस बेलिम यांना मारपीट केली होती. तसेच त्यांचे भाऊ यांच्याद्वारे रजिस्टर्ड खरीदी खत करून वर्ष २०११ मध्ये खरेदी केलेले घर खाली करण्यासाठी धमकावले. ठाणेदार सपकाळ यांनी लकड़गंज स्थित घराची तोड़फोड़ आणि मारपीट केली असल्याचा व्हिडीओ कॅमेरा मध्ये कैद झाला आहे. हरिस आणि त्यांच्या परिवाराच्या विरोधात ठाणेदार शैलेश सपकाळ यांनी खोटे गुन्हे दाखल केल्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी आणि त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केले.
अधिक वाचा : दगडाने ठेचून पत्नीची हत्या; पतीस अटक
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola