नवी दिल्ली: युझर्सच्या डेटा चोरी प्रकरणी काही महिन्यांपूर्वी अडचणीत आलेल्या फेसबुकवर आणखी एक मोठे संकट आले आहे. युझर्सच्या डेटा चोरीची आणि त्याचा चुकीचा वापर केल्याचा आणखी एक अहवाल समोर आला आहे. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार केवळ 81 हजार फेसबुक युझर्सचे अकाऊंट हॅक करण्यात आले नाही तर त्यांचे पर्सनल मेसेज दिखील विकले जात आहेत.
युझर्सच्या डेटा चोरीचे प्रकरण गेल्या वर्षीय सप्टेंबर महिन्यात उघडकीस आले होते. FBSaler नावाच्या एका युझरने इंटरनेट फोरमला याची माहिती दिली होती. त्याने दिलेल्या माहितीनुसार फेसबुकवरील 12 कोटी खात्यांची माहिती विकली जात आहे. अर्थात त्यानंतर सायबर सुरक्षा कंपनी डिजिटल शॅडोजने या प्रकरणाचा तपास केला तेव्हा एकूण 81 हजार खाती आणि त्यातील पर्सनल मेसेज विकल्याचे समोर आले.
रिपोर्टनुसार हॅकर्सनी प्रत्येक खाते 6 रुपये 50 पैशांना विकले आहे. ज्या वेबसाईटला हा डेटा विकला गेला ती कंपनी पीटर्सबर्ग येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.
या संपूर्ण प्रकरणावर फेसबुकने स्पष्टीकरण दिले आहे. त्याच्या मते अशा प्रकारे कोणतेही अकाऊंट हॅक झालेले नाही. तसेच जो डेटा बाहेर आला आहे त्यात त्यांची (फेसबुकची) कोणतीही चुक नाही.
अधिक वाचा : व्हॉट्सअॅपच्या ग्रुप चॅटमध्ये मिळणार ‘Private Reply’ फीचर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola