मुंबई : अभिषेक कपूरद्वारा दिग्दर्शित ‘केदारनाथ’ चित्रपटाच्या पोस्टरचा फर्स्ट लूक प्रसिध्द करण्यात आला आहे. या चित्रपटातून सारा अली खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती सुशांत सिंग राजपूतसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार असल्यामुळे काही दिवसांपासून सारा चांगलीच चर्चेत आहे.
No tragedy, no wrath of nature, no act of God can defeat the power of love! Presenting the official #KedarnathPoster, teaser out at 12 noon @itsSSR #SaraAliKhan @RSVPMovies @RonnieScrewvala @gitspictures @pragyadav_ @ZeeMusicCompany #Kedarnath #jaibholenath ? pic.twitter.com/lgdgIwC2db
— Abhishek Kapoor (@Abhishekapoor) October 29, 2018
प्रसिध्द करण्यात आलेल्या पोस्टरवर एक मिश्किलता पाहायला मिळते. सुशांत सिंग आपल्या पाठीवर साराला वाहून नेत असताना दिसतोय. या चित्रपटातून साराचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या अनेक नजरा तिच्या परफॉर्मन्सवर लागलेल्या आहेत.
‘केदारनाथ’ चित्रपट येत्या ७ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. तर रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ चित्रपटात सारा रणवीरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
अधिक वाचा : ‘रॉकेट्री – द नंबी इफेक्ट’ घेऊन येतोय आर. माधवन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola