परभणी (प्रतिनिधी) : परभणीत महिलेने शरीर सुखासाठी तगादा लावल्याने एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सचिन मिटकरी असे या तरुणाचे नाव असून आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये महिलेने धमकी दिल्याचा उल्लेख केला आहे.
परभणीतील वसमत रोड येथील दत्त धाम येथे राहणाऱ्या सचिन मिटकरी या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी सचिनने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यात सचिनने महिलेच्या नावाचा उल्लेख केला आहे. ‘त्या महिलेने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. माझे लग्न झाले आहे हे तिला माहित असूनही ती माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करत होती. शरीरसंबंध ठेवले नाही तर बदनाम करण्याची धमकी ती महिला देत आहे.
त्या महिलेचे आणखी दोन मुलांसोबत संबंध असून तिने माझ्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केला. याला कंटाळून आत्महत्या करत आहे’, असे त्याने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola