अकोला (शब्बीर खान) : वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे सध्या संपूर्ण जिल्हा भारनियमनाने ग्रासला असून ग्रामीण भागातील जणता हैराण झाली आहे. ऐन सणासुदीच्या काळात १२ तासाचे भारनियमन सुरू आहे. सध्या नवरात्र उत्सव सुरू असून, भारनियमनाचा फटका हा उत्सवाला सोसावा लागत आहे .तसेच ग्रामीण भागात शेतीला रात्री वीज पुरवठा होत असून, तो पुरवठा सकाळी सुरू ठेवण्यात यावा व ग्रामीण भागातील भारनियमन बंद करण्यात यावे याकरीता राष्ट्रवादी युवक कॉगे्रस ग्रामीण व शहरच्या वतीने उपकार्यकारी अभियंता अकोट यांना रा. यु. कॉ. अध्यक्ष गजेंद्र पाचडे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रा. यु. कॉ. च्या वतीने देण्यात आला.
निवेदन देते वेळी शहर अध्यक्ष जमीर इकबाल, नंदकीशोर भांबुरकार, हुताश पुंडकर , गोपाल भांबुरकार, अतुल अढाऊ, डॉ. महेश कुलट, गजानन पडोळे, मंगेश सोळंके , निलेश हींगणकार, अक्षय रोकडे, हर्षल ठाकरे, श्रीकांत साबळे, श्रीयश चौधरी, अंकुश मोडक, इरफान खान, अकरम खान, मो. अबीब, सनी पुंडकर, अभिमन्यु धांडे, निलेश रामेकर, विठ्ठल नारे, राजेश नारे इ. कार्यकर्ते पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा : अकोल्यात तीन दिवसीय राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धा व प्रदर्शनीचे आयोजन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola