अकोला (शब्बीर खान) : अकोला शहरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांविरूध्द शहर वाहतूक नियंत्रण शाखेने शनिवार, १३ ऑक्टोबर रोजी कारवाई करीत ९२ वाहने जप्त केली आहेत. या वाहनधारकांकडून ८४ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरामध्ये अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांविरूध्द शहर वाहतूक नियंत्रण शाखेने १३ ऑक्टोबर रोजी मोहिम राबविली. यामध्ये काळीपिवळी, टॅक्सी, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ओमनी गाड्या, ग्रामीण परमीटचे खाजगी ऑटो यांच्याविरूध्द ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई शाळा, महाविद्यालय, मध्यवर्ती बसस्थानक चौक, टॉवर चौक, अशोक वाटिका चौक, अग्रसेन चौक याठिकाणी करण्यात आली आहे. यामध्ये वाहतूक शाखेने ९२ वाहने जप्त केली असून, या वाहनधारकांकडून ८४ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
अधिक वाचा : अकोल्यात तीन दिवसीय राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धा व प्रदर्शनीचे आयोजन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola