अकोला(शब्बीर खान) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार अॅङ सैय्यद नतिबोद्दीन खतीब अध्यक्ष असलेल्या बाळापूर नागरी सहकारी पत संस्था मर्या. बाळापूर या संस्थेने हजारो खातेदारांचे पैसे परत न केल्यामुळे ही संस्था वादग्रस्त ठरली आहे. माजी आमदार तथा पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. सै.नातीकोद्दीन सै.हुसामोद्दीन यांच्यासह 13 संचालकांवर कलम 406,409,418,467,468,471,504,120 ब,आयपीसी सह कलम 3,4 एमपीआयडी अॅक्ट 1999 नुसार गुन्हे दाखल केले दाखल झालेले आहेत. मोठा आर्थिक घोटाळा असल्याने हे प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. दरम्यान काही ग्राहकांनी यापूर्वी पैसे परत मिळावे म्हणून ग्राहक मंचात धाव घेतली होती. ग्राहक मंचाने वेगवेगळयावेळी निकाल देवून 18 गुंतवणुकदार ग्राहकांना 51 लाख 43 हजार 261 रूपये, केतन पडधरिया यांना 4 लाख 25 हजार रुपये, अन्य 06 ग्राहकांना 13 लाख 37 हजार 500 रुपये देण्याचे आदेश यापूर्वी तीन स्वतंत्र निकालाव्दारे दिले होते. मुळ रक्कमेवर 9 टक्के व्याज व न्यायालयीन खर्च म्हणून प्रत्येकाला 3 हजार रूपये देण्याचे आदेशही ग्राहक मंचाने दिले होते. ग्राहक मंचाने गुरुवार दि.04 ऑक्टोबर रोजी प्रमोद मानकर व पुष्पा मानकर यांना 9 लाख रुपये, 10 टक्के व्याज व खर्च देण्याचे आदेश ग्राहक मंचाने अँड. एस.एन.खतीब यांच्यासह 08 संचालकांना दिले आहेत.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाचे अध्यक्ष श्रीमती एस.एम.उंटवाले व सदस्य संजय एस. जोशी यांनी हे आदेश दिले आहेत. दिलेल्या निकालात पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्याम शेगोकार, व्यवस्थापक फिरोज खान जहाँगीर खान,नंदकिशोर पंचभाई, रजियाबेगम खतिब, हाजी शेख वजीर इब्राहीम, निर्मलाताई उमाळे, मोहम्मद हनीफ अब्दुल मुनाफ यांच्यासह पतसंस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अॅड एस. एन. खतीब यांना ग्राहकांचे पैसे परत देण्याचे आदेश दिल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात व विशेषत: काँग्रेस वर्तुळात खळबळ उडाली आहे. तक्रारकर्त्याच्या वतीने अँड. बी.एस. भागवत यांनी तर बाळापूर नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे अॅड. डी.एल.म्हसाये यांनी बाजू मांडली.9 लाख रूपये परत मिळविण्यासाठी प्रमोद मानकर दाम्पत्याने ग्राहक मंचात तक्रार दाखल केली होती.या बाबतची सविस्तर माहिती अशी की, बाळापूर तालुक्यातील नकाशीचे मुळ रहिवासी असलेले व सध्या अकोल्यात वास्तव्यास असलेले प्रमोद गोंविदराव मानकर यांनी बाळापूर नागरी सहकारी पत संस्था मर्या. बाळापूर या संस्थेत 13 टक्के व्याजदरावर 13 महिने कालावधीसाठी दि.22 जुलै 2014 रोजी 5 लाख तर दि.17 एप्रिल 2015 रोजी 1 लाख रुपये गुंतविले होते. त्यांची पत्नी पुष्पा प्रमोद मानकर यांनी दि.30 जून 2015 रोजी प्रत्येकी 1 लाख रुपयांच्या 2 जमा ठेवी काढल्या होत्या. बाळापूर नागरी पतसंस्थेने प्रमोद मानकर व त्यांच्या पत्नीची मुदत ठेव खात्यामध्ये 9 लाख रुपये जमा असून ती रक्कम देणे बाकी असल्याचे लेखी स्वरुपात कबूल केले आहे. परंतु सध्या संस्थेजवळ रोख रक्कम उपलब्ध नसल्याने थकीत कर्जदारांकडून रक्कम वसुल केल्यानंतर आपणास रक्कम परत देणार असल्याचे प्रमोद मानकर यांना कळविले होते.
खातेदाराला मुळ रक्कम, नुकसान भरपाई व कोर्ट खर्च देण्याचे ग्राहक मंचाचे आदेशग्राहक मंचाने अॅङ खतीब यांच्या पतसंस्थेचा दावा फेटाळून लावत प्रमोद मानकर व त्यांच्या पत्नीने पतसंस्थेकडे जमा केलेली मुदत ठेवीची संपूर्ण रक्कम 9 लाख रुपये परत देण्याचे तसेच त्यावर द.सा.द.शे. 10 टक्के व्याज देण्याचे आदेश पतसंस्थेस दिले. याशिवाय शारिरीक, मानसिक, आर्थिक नुकसान भरपाई व प्रकरणाच्या न्यायिक खर्चापोटी एकत्रित रक्कम 8 हजार रुपये दि.4 ऑक्टोंबर पासून 45 दिवसाच्या आत देण्याचे आदेश ग्राहक मंचाने दिले. अॅङ एस.एन.खतीब यांच्या पतसंस्थेवर ग्राहक मंचाने ओढले कठोर ताशेरे गुंतवणूकदार तक्रारकर्ते व बाळापूर नागरी सहकारी पतसंस्था या दोन्ही पक्षाची बाजू ऐकल्यानंतर ग्राहक मंचाने आपल्या निकालात पतसंस्थेच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली. तक्रारदार गुंतवणूकदारांनी आपली रक्कम परत देण्याची मागणी करुनही पतसंस्थेने ती परत न देणे ही कृती ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत त्रुटीपूर्ण सेवा, निष्काळजीपणा व अनुचित व्यापार व्यवहार प्रथा यामध्ये मोडत असल्याचे कठोर ताशेरे अॅड. खतीब यांच्या पतसंस्थेवर ओढले.
अधिक वाचा : अकोल्यातील ‘आरटीओ’ कार्यालयाचे होणार स्थानांतरण आ. बाजोरियांचा पुढाकार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola