मुंबई : नाश्त्यावरून झालेल्या भांडणामुळे एका महिलेने तिच्या आत्याच्या डोक्यात १४ वेळा चाकू खुपसल्याची भयंकर घटना घडली आहे. स्वप्ना कुलकर्णी (39) असं या महिलेचं नाव असून ती ठाणे येथे राहते.
स्वप्ना ही बेरोजगार असून गेली अनेक वर्षं आपल्या ७५ वर्षीय आत्यासोबत राहत होती आणि आर्थिक गरजांसाठी ती आत्यावरच अवलंबून होती. शनिवारी सकाळी नाश्ता न बनवण्यावरून तिचा आत्याशी वाद झाला. या वादाचं रुपांतर मोठ्या भांडणात झालं. संतापाच्या भरात स्वप्नाने स्वयंपाकघरातील चाकूने तिच्या आत्याच्या डोक्यावर १४ वेळा वार केले.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी स्वप्ना हिला अटक केली. तिच्या आत्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
अधिक वाचा : रागाच्या भरात मुलाने केली आईची हत्या
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola