मुंबई : केंद्र सरकारच्य आवाहनाला तातडीने प्रतिसाद देत राज्य सरकारनेही इंधनावरच्या व्हॅटमध्ये अडीच रूपयांनी कपात केलीय त्यामुळे महाराष्ट्रात आता पेट्रोल पाच रूपयांनी स्वस्त होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. इंधन दरवाढीच्या भडक्यानंतर अखेर केंद्र सरकारला शुक्रवारी जाग आली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अडीच रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतलीये. केंद्राने सर्व राज्यांनाही व्हॅटमध्येही अडीच रूपयांची कपात करण्याची सूचना केली होती.
Maharashtra Government also decided to give additional relief of ₹2.5/litre on Petrol to give total benefit of ₹5/litre in the State of Maharashtra.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 4, 2018
देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी शंभरीकडे वाटचाल केलीये. त्यामुळे सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जातोय. दररोज वाढ होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेच्या खिश्याला कात्री बसत आहे. अर्थमंत्री अरूण जेटली यांची पत्रकार परिषद घेऊन इंधन दरवाढीवर मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला.
पेट्रोलियम कंपन्यांकडून 1 रुपया तर केंद्र सरकारने दीड रुपयांची कपात केलीये. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अडीच रुपयांची कपात झालीये अशी घोषणा जेटली यांनी केली.
राज्य सरकारला याबद्दल तशी सुचना देण्यात येणार आहे. राज्य सरकारनेही करात अडीच रुपये कपात केली तर इंधनाच्या करांमध्ये एकूण पाच रूपयांची कपात होऊ शकते अशी माहिती जेटली यांनी दिली. या कपातीमुळे सरकारच्या तिजोरीवर 10.50 हजार कोटींचा भार पडणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयांची घसरण झालीये. त्यामुळे क्रुड तेलाच्या किंमतीत वाढ झालीये. किंमतीवर आता सरकारचं नियंत्रण नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातल्या दरांप्रमाणे भाव ठरत असल्याचंही जेटली यांनी स्पष्ट केलं.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola