नवी दिल्ली – कोणत्याही प्रकरणात पीडित व्यक्तीनं आरोपीला वाचवण्यासाठी त्याच्यासोबत तडजोड केली आणि आपला जबाब फिरवला तर पीडित व्यक्तीविरोधातही खटला चालवला जाऊ शकतो, असे सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केले आहे. सुप्रीम कोर्टानं असंही सांगितले की, जर बलात्कार प्रकरणात आरोपीविरोधात ठोस पुरावे असतानाही बलात्कार पीडित आपला जबाब बदलून आरोपीच्या बचावासाठी प्रयत्न करत असल्यास तिच्याविरोधातही खटला नोंदवला जाऊ शकतो.
न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती नवीन सिन्हा आणि न्यायमूर्ती केएम जोसेफ यांच्या खंडपीठानं म्हटले की, बलात्कार प्रकरणातील आरोपींना पीडितेच्या वैद्यकीय अहवालाशिवाय अन्य कोणत्याही आधारे क्लीन चिट दिली गेली, तरीही पीडितेविरोधात खटला चालवला जाणार. एका खटल्याच्या सुनावणीवेळी कोर्टानं हा निर्णय दिला आहे. एका बलात्कार प्रकरणात कोर्टानं दोषीला 10 वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र आपल्यावर बलात्कार झाला नसल्याचं सांगत पीडितेनं जबाब बदला. या खटल्याच्या सुनावणीवेळी कोर्टानं निर्णय देत संबंधितांना फटकारलं आहे.
14 वर्षांपूर्वीचा खटला
2004 मध्ये बलात्कार पीडिता केवळ 9 वर्षांची होती आणि तिच्या आरोपीविरोधात एफआयआर दाखल केली होती. त्यावेळेस पीडितेची वैद्यकीय तपासणीदेखील करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला अटकदेखील केली. पीडितेनं आरोपीला ओळखलंदेखील. सहा महिन्यानंतर पीडित आणि मुख्य साक्षीदार (पीडितेची बहीण) बलात्कार झाल्याचे फेटाळून लावले आणि पडल्यामुळे जखमी झाल्याचे सांगितले. यामुळे आरोपीची सुटका करण्यात आली.
दरम्यान, गुजरात हायकोर्टानं पीडितेच्या वैद्यकीय अहवाल आणि अन्य पुराव्यांच्या आधारे आरोपीला दोषी ठरवले. दोषी ठरवण्यात आल्यानंतर त्यानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली मात्र त्याची याचिका रद्द करण्यात आली.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola