गावंडगांव (अनिकेत राठोड): आज सोशल मिडीयाचा वापर करणारा प्रत्येक व्यक्ती व्हॉट्स ॲप समुहाशी जुळलेला असतो. कारण सोशल मिडीया या तंत्रज्ञानाच्या युगामधील महत्वाचे साधन बनले आहे याचा योग्य वापर केला तर एक नवा आदर्श निर्माण समाजासमोर होऊ शकते. याचेच प्रतिक म्हणजे पातुर तालुक्यातील गावंडगांव या गावाचा व्हॉट्स ॲप समुह गावंडगांव विचार मंच या समुहाची निर्मीती दिनांक ०१ ऑक्टोंबर २०१६ रोजी जनता मोर्चाचे संयोजक समाजसेवक व राजकीय विश्लेशक रामेश्वर राठोड यांनी सगळ्यांचा साथ गावाचा विकास या हेतुने या समुहाची निर्मीती करुन गावंडगांव मधील व नौकरी, व्यवसाय , शिक्षणासाठी परगावी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला या समुहाशी जोडूनी सर्वाना एकत्र आणले आहे . आजच्या धकाधकीच्या व व्यस्त जिवनात गावाशी जुळून राहण्यासाठी कोणालाच वेळ मिळत नाही पण आज गावंडगांव येथील पण काही निमीत्ताने गावाबाहेर असलेले व गावातील सर्वच मंडळी या समुहाशी जोडल्या गेली आहे. गावातील काही महत्वाचे निर्णय, गावातील समस्या यावर चर्चा व प्रत्येकाचा वाढदिवस निवड नियुक्ती दुखद वार्ता सुयश याबद्द्ल या समुहाद्वारेच सर्वांना माहीती होते यामुळे गावंडगांवातील प्रत्येक व्यक्ती गावंडगांव विचार मंच द्वारे आपल्या जन्मभुमीशी जोडल्या गेला असुन दि. ०१/०१०/२०१८ ला या समुहाचा द्वितीय वर्धापन दिन आहे . आज प्रत्येक गावाने या समुहाचा आदर्श घेऊन एक गाव एक समुह निर्माण करावा अशी माहीती गावंडगांव विचार मंच मधील एक सदस्य अनिकेत अनिल राठोड यांनी या समुहाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दिली.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola