अकोट (प्रतिनिधी): स्थानिक श्री शिवाजी विद्यालय व क.महाविद्यालयात लोकजागर मंचने स्वच्छता पंधरवाड्याचे निमित्त साधून विद्यालयातील सर्व वर्गखोल्या व कार्यालयात कचरा पेटीचे वाटप करण्यात आले. लोकजागर मंच सातत्याने विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करीत आहे त्याच माध्यमातून विद्यार्थ्यांनाही शालेय जीवनापासूनच स्वच्छतेची सवय व स्वयंशिस्त ह्या सद्गगुनांची सवय लागावी म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मिनाताई धुळे,पर्यवेक्षक श्री. सावरकर सर,पर्यवेक्षिका श्रीमती अंजली गावंडे, लोकजागर मंचचे अनंत सपकाळ, शहर कार्याध्यक्ष राजेश गावंडे, शहर अध्यक्ष सुरज शेंडोकार व आकाश बरेठीया यांची उपस्थिती होती.अनंत सपकाळ यांनी आपल्या मनोगतातून लोकजागरची भूमिका विषद केली व सुरु असलेल्या विद्यार्थोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. अध्यक्षिय भाषणातून श्रीमती धुळे मँडम यांनी लोकजागर मंचचे अध्यक्ष श्री. अनिलदादा गावंडे यांचे व लोकजागर मंच राबवीत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले व पुढील वापचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचलन श्री. वालसिंगे सर यांनी, प्रास्ताविक श्री. थुटे सर यांनी तर आभार श्री. पांडे सर यांनी केले.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola