पातूर : पातूर वासीयांसाठी प्रशासनाने आगीखेड रोड वरील तलाव आणि MIDC तलाव येथे विसर्जनाची व्यवस्था केली होती.पातूर शहरातील गणेश मंडळ तसेच घरगुती गणेश मूर्ती या ठिकाणी विसर्जनासाठी आल्या होत्या.त्याठिकाणी कुठलाही अनुकुचित प्रकार घडू नये याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपत्ती व्यवस्थापन व बचाव पथक पातूर व प्रशासन आपल्या सर्वांच्या सेवेसाठी सज्ज होते त्यानीं कुठलीही दुर्घटना होऊ नये यासाठी अथक परिश्रम घेतले. प्रशासन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बचाव पथक ह्यांच्या ह्या सेवेप्रती बचाव पथकाचे अध्यक्ष श्याम गाडगे उपाध्यक्ष अमर ढोणे सचिव नितिन फुलारी , विनोद फुलारी,प्रभुदास बोंबटकार ,यांचे यावेळी श्री शिवाजी गणेशोत्सव मंडळ ,गुरुवार पेठ पातूर यांचे वतिने मा.तहसिलदार साहेब यांचे हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी मंडळाचे अध्यक्ष सचिन बारोकार ,उपाध्यक्ष छत्रपती गाडगे,तसेच प्रदीप काळपांडे,डिगांबर बंड,उमेश काळपांडे,बालु पहेलवान,विजय बंड,गणेश इंगळे,चेतन इंगळे,अजय इंगळे,गजानन वानखडे तसेच मंडळाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
अधिक वाचा : गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात पातुर वासियांचा गणरायाला भावपूर्ण निरोप
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola