सिरसोली(विनोद सगणे)– महाराष्ट्र शासन व पानी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दुष्काळ मुक्त महाराष्ट्र करावयाचा असेल तर ही चळवळ निर्माण करावी लागते ही चळवळ आंदोलनाचे स्वरूप प्राप्त करते ही ताकद कोणात असते तर ती तरुणाना मध्ये असते. असे मत पाणी फाँऊडेशन जिल्हा समन्वयक नरेंद्र काकड यांनी व्यक्त केले. सिरसोली येथील स्व.बाबासाहेब खोटरे विद्यालय व कनिष्ट महाविद्यालय सिरसोली ता.तेल्हारा येथे तेल्हारा तालुका पाणी फाँऊडेशन तर्फे दुश्काळ मुक्त महाराष्ट्र या विषयावर मार्गदर्शन नरेंद्र काकड यांनी केले. त्यांचा सोबत तेल्हारा तालुका प्रमुख उज्जेनकर व शेरेकर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरवातीला पाणी फाउंडेशन चे कार्य व त्याचा झाला फायदा या वर माहिती चित्रपट दाखविण्यात आला व नंतर विद्यार्थ्यांशी संवाद करण्यात आला त्या नंतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाला यावेळी प्राचार्य जयवंत पुंडकर, प्रा.मिलिंद खोटरे ,प्रा.प्रभाकर ठाकरे ,प्रा.संतोष नाहाटे, जगदेव कात्रे, अशोक घाटे, राजेश तेलगोटे, उमेश तेलगोटे, निळकंठ काळे, नंदा गावंडे,अंजली खोटरे, गजानन काळबांडे, किसन सोलकर, गजानन भारसाकळे शिक्षक व कर्मचारी व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमच्या शेवटी मान्यवरांनी सर्व विद्यार्थ्या सोबत दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प केला.
अधिक वाचा : अकोटात अवैध गौण खनिजाची वाहतुक थांबता थाबेंना!
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola