हिवरखेड (दीपक रेळे)- हिवरखेड येथील वार्ड क्रमांक 1 मधील कोंडवाडा ते सरकारी दवाखाना रस्त्यादरम्यान दत्त भारती मंदिर जवळील लेंडी नाल्याचा पुल गिट्टी भरलेल्या जड टिप्पर सहित कोसळला. सदर ट्रक क्रमांक MH 34 A 4849 हा अकोट येथील नुरूर कमर हिबजूल कमर यांच्या मालकीचा असून तो हिवरखेड येथे दत्त भारती मंदिर जवळ ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या शौचालय बांधकामासाठी बोल्डर घेऊन आला होता. बोल्डर खाली करण्याकरिता ड्रायव्हर अब्दुल सलीम हा फुल भरलेल्या टिप्पर ला रिव्हर्स घेत असताना जवळपास तीस वर्षे जुना पूल जीर्ण झाल्यामुळे कोसळला सोबतच ट्रक सुद्धा अपघातग्रस्त झाला. यामध्ये पूल पूर्णतः नेस्तनाबूत झाला तर टिप्पर चे मोठ्या प्रमाणात चेसिस दोन्हीकडून तुटले, डिझेल टँक फुटले, ऑइल गळती झाली, व मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
रिव्हर्स घेत असताना टिप्पर चा मागील भाग कोसळला त्याजागी टिपर चा समोर चा भाग कोसळला असता तर चालक वाहकाची जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती सदर पुल लहान आणि खूप जुना असल्यामुळे या या जागी नवीन पूल बांधावे अन्यथा पुलाची उंची वाढविण्यात यावी यासाठी या परिसरातील जागरूक नागरिकांनी व सामाजिक कार्यककर्ता धिरज बजाज यांनी मागील पाच वर्ष पाच वर्षात ग्रामपंचायत ला व ग्रामसभेमध्ये अनेक निवेदने दिली पण आश्वासना व्यतिरिक्त काहीही मिळाले नाही. सदर पूलाकरिता आतापर्यंत ग्रामपंचायत अथवा कोणत्याही लोकप्रतिनिधींचा निधी मंजूर केलेला नाही.
सदर घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. सदर पूल कोसळल्याने स्वस्तिक कॉलोनी चा मुख्य गावाशी संपर्क तुटला असून जवळपास डिड ते दोन किलोमीटर फेऱ्याने नागरिकांना ये जा करावी लागणार आहे. सदर पुलाचे काम सुधाकरराव गनगणे यांच्या आमदारकीच्या काळात सण 1989 दरम्यान झालेले असल्याचेे श्यामशील भोपळे यांनी सांगितले, तसेच त्या पुलाचा कालावधी संपला की नाही याची माहिती मिळू शकली नाही. तुटलेल्या पुलाचे निरीक्षण करताना सदर पुलाच्या बांधकामात लोखंडाचा कमी प्रमाणात वापर आणि पतल्या छड्यांचा वापर झाला असल्याची बाब प्रकर्षाने उपस्थित नागरिकांना जाणवली. त्यामुळे तत्कालीन पूल बांधकाम दर्जाबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत.
पूल कोसळल्याची माहिती मिळताच सरपंच सौ शिल्पाताई भोपळे, उपसरपंच डॉ. शकील अली मिरसाहेब, माजी सरपंच मिलिंद भोपळे, ग्रामविकास अधिकारी बी एस गरकल, रमेश दुतोंडे, श्यामशील भोपळे, अझिज खा, सुनील इंगळे, धिरज बजाज, नानाभाऊ भगत, विनोद वानखडे, कैलास कनपटे, रवी बोचरे, गोपाल गावंडे, प्रभाकर जाधव इत्यादीं मान्यवरांनी इत्यादींनी घटनास्थळी भेट देवून घटनेची माहिती जाणून घेतली. Jcb मशीन द्वारे ट्रक ला नाल्यामधून बाहेर काढावे लागले.
प्रतिक्रिया
सदर महत्वाचा पूल तुटल्याने संपर्क तुटला आहे. सदर जागी नवीन पुलाच्या निर्मितीकरिता आम्ही युद्धस्तरावर प्रयत्न करणार आहोत. -शिल्पाताई भोपळे (सरपंच हिवरखेड)
पूल तुटल्यामुळे आमचा सरकारी दवाखाना, मुलांची शाळा, महावितरण, सोनवाडी बस स्टॅन्ड, शेती इत्यादींसोबत संपर्क तुटला असून 2 किलोमीटर चा फेरा झाला आहे त्यामुळे तात्काळ नवीन उंच आणि दर्जेदार पुलाची निर्मिती करावी अशी आमची सर्व नागरिकांची एकमुखी मागणी आहे. – प्रभाकर जाधव, कैलास कनपटे (ग्रामस्थ हिवरखेड)
अधिक वाचा : हिवरखेड येथे पंतप्रधान व भाजप शहराध्यक्ष यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola