• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, June 6, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अखेर लेंडी नाल्याचा तो पुल कोसळलाच…

Team OurAkola by Team OurAkola
June 9, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
77 1
0
हिवरखेड
11
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

हिवरखेड (दीपक रेळे)- हिवरखेड येथील वार्ड क्रमांक 1 मधील कोंडवाडा ते सरकारी दवाखाना रस्त्यादरम्यान दत्त भारती मंदिर जवळील लेंडी नाल्याचा पुल गिट्टी भरलेल्या जड टिप्पर सहित कोसळला. सदर ट्रक क्रमांक MH 34 A 4849 हा अकोट येथील नुरूर कमर हिबजूल कमर यांच्या मालकीचा असून तो हिवरखेड येथे दत्त भारती मंदिर जवळ ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या शौचालय बांधकामासाठी बोल्डर घेऊन आला होता. बोल्डर खाली करण्याकरिता ड्रायव्हर अब्दुल सलीम हा फुल भरलेल्या टिप्पर ला रिव्हर्स घेत असताना जवळपास तीस वर्षे जुना पूल जीर्ण झाल्यामुळे कोसळला सोबतच ट्रक सुद्धा अपघातग्रस्त झाला. यामध्ये पूल पूर्णतः नेस्तनाबूत झाला तर टिप्पर चे मोठ्या प्रमाणात चेसिस दोन्हीकडून तुटले, डिझेल टँक फुटले, ऑइल गळती झाली, व मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

रिव्हर्स घेत असताना टिप्पर चा मागील भाग कोसळला त्याजागी टिपर चा समोर चा भाग कोसळला असता तर चालक वाहकाची जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती सदर पुल लहान आणि खूप जुना असल्यामुळे या या जागी नवीन पूल बांधावे अन्यथा पुलाची उंची वाढविण्यात यावी यासाठी या परिसरातील जागरूक नागरिकांनी व सामाजिक कार्यककर्ता धिरज बजाज यांनी मागील पाच वर्ष पाच वर्षात ग्रामपंचायत ला व ग्रामसभेमध्ये अनेक निवेदने दिली पण आश्वासना व्यतिरिक्त काहीही मिळाले नाही. सदर पूलाकरिता आतापर्यंत ग्रामपंचायत अथवा कोणत्याही लोकप्रतिनिधींचा निधी मंजूर केलेला नाही.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?


सदर घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. सदर पूल कोसळल्याने स्वस्तिक कॉलोनी चा मुख्य गावाशी संपर्क तुटला असून जवळपास डिड ते दोन किलोमीटर फेऱ्याने नागरिकांना ये जा करावी लागणार आहे. सदर पुलाचे काम सुधाकरराव गनगणे यांच्या आमदारकीच्या काळात सण 1989 दरम्यान झालेले असल्याचेे श्यामशील भोपळे यांनी सांगितले, तसेच त्या पुलाचा कालावधी संपला की नाही याची माहिती मिळू शकली नाही. तुटलेल्या पुलाचे निरीक्षण करताना सदर पुलाच्या बांधकामात लोखंडाचा कमी प्रमाणात वापर आणि पतल्या छड्यांचा वापर झाला असल्याची बाब प्रकर्षाने उपस्थित नागरिकांना जाणवली. त्यामुळे तत्कालीन पूल बांधकाम दर्जाबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत.

पूल कोसळल्याची माहिती मिळताच सरपंच सौ शिल्पाताई भोपळे, उपसरपंच डॉ. शकील अली मिरसाहेब, माजी सरपंच मिलिंद भोपळे, ग्रामविकास अधिकारी बी एस गरकल, रमेश दुतोंडे, श्यामशील भोपळे, अझिज खा, सुनील इंगळे, धिरज बजाज, नानाभाऊ भगत, विनोद वानखडे, कैलास कनपटे, रवी बोचरे, गोपाल गावंडे, प्रभाकर जाधव इत्यादीं मान्यवरांनी  इत्यादींनी घटनास्थळी भेट देवून घटनेची माहिती जाणून घेतली. Jcb मशीन द्वारे ट्रक ला नाल्यामधून बाहेर काढावे लागले.

प्रतिक्रिया
सदर महत्वाचा पूल तुटल्याने संपर्क तुटला आहे. सदर जागी नवीन पुलाच्या निर्मितीकरिता आम्ही युद्धस्तरावर प्रयत्न करणार आहोत. -शिल्पाताई भोपळे (सरपंच हिवरखेड)

पूल तुटल्यामुळे आमचा सरकारी दवाखाना, मुलांची शाळा, महावितरण, सोनवाडी बस स्टॅन्ड, शेती इत्यादींसोबत संपर्क तुटला असून 2 किलोमीटर चा फेरा झाला आहे त्यामुळे तात्काळ   नवीन उंच आणि दर्जेदार पुलाची निर्मिती करावी अशी आमची सर्व नागरिकांची एकमुखी मागणी आहे. – प्रभाकर जाधव, कैलास कनपटे (ग्रामस्थ हिवरखेड)

अधिक वाचा : हिवरखेड येथे पंतप्रधान व भाजप शहराध्यक्ष यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या उपस्थितीत जनतेच्या समस्या निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद

Next Post

Asia Cup 2018: भारताची आज हाँगकाँगशी लढत

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
Asia Cup 2018: भारताची आज हाँगकाँगशी लढत

Asia Cup 2018: भारताची आज हाँगकाँगशी लढत

मुर्तिजापूर

मुर्तिजापूर भाजप शहर च्या वतीने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त स्वच्छ कार्यालय अभियान

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.