दानापूर (सुनिलकुमार धुरडे)- संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील 18 वर्षीय मतिमंद मुलीवर बलात्कार करणाऱ्या 45 वर्षीय नराधमा विरूद्ध जलदगती न्यायालयात प्रकरण निकाली काढून फाशीची शिक्षा घ्या या मागणीचे निवेदन तेल्हारा तहसीलदार यांना बारी समाजाच्या वतीने देण्यात आले . बुलढाणा जिल्ह्य़ातील संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथे प्रकाश पांडूरंग लोणे या 45 वर्षीय नराधमाने गावातील एका 18 वर्षीय मुलीचा घरात रॉकेल मागण्याच्या बहाण्याने प्रवेश करून मतिमंद मुलीवर बलात्कार केला .
आरोपीला पोलीसांनी अटक केली असून या प्रकरणाला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा घ्या या मागणीचे निवेदन तेल्हारा तालुका बारी समाजाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले .या निवेदनावर सुभाष रौंदळे ,मधुकर पोके,प्रमोद रेखाते ,विनोद पोके ,देवेंद्र नाठे, विरेंद्र येऊल ,पंकज रौंदळे, डाॅ.विजय राऊत , सुनिल धुरडे , शहादेव ढगे , प्रल्हाद रौंदळे, विशाल हागे, गणेश ताळे, सागर ढगे , भगवान हागे , अशोक नाठे , वासुदेव कतोरे ,दिपक पोके ,कैलास बोडखे या सह सर्व समाज बांधवांच्या सह्या आहेत .त्वरीत कार्यवाही न झाल्यास ता.(25) सप्टेंबर रोजी बारी समाजाच्या वतीने धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा हि निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
अधिक वाचा : दानापूर येथे किशोरी प्रशिक्षण संपन्न
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola