अकोट (प्रतिनिधी): अकोट तालुक्यातील ग्राम पणज येथे जैष्ठ गौरी पुजनानिम्मीत्त दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा श्री.महालक्ष्मी मंदिरर रोजी याञा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बोर्डी नदिच्या काठावर पुरातण जार्गुत म्हणुन पणजच्या महालक्ष्मी माता मदिराची सर्वीकडे ख्याती आहे .मदिराच्या बाजुला एक पुरातन दिपमाळा व दुसरा बाजुला पुरातन पायविहीर अद्यापही अस्तीत्वात आहे महालक्ष्मी मातेचे माहेर अडीच दिवसाचे असुन या दिवसामध्ये गणेशाच्या आगमना बरोबरच महालक्ष्मी माता मंदिरावर भव्य याञा महोत्सव असतो पणज हे गाव महालक्ष्मी मातेचे माहेर असल्याची आख्यायिका आहे.
याञा महोत्संव व नवराञात पचंकोशीतील कानाकोपरातुन हजारोच्या संख्येने भाविक भक्त दरवर्षी येथे हजेरी लावतात याञा महोत्सव दरम्यान महालक्ष्मी माता मदिरात भजन किर्तनासह होम हवनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते १५ सप्टेंबर गौरी स्थांपना व १६ सप्टेबर मुख्य याञा महोत्सव व महाप्रसादाचे आयोजन असते १७ सप्टेंबरला गौरी विसर्जनाचा कार्यक्रम पार पडणार आहे दरवर्षी या याञा महोत्सवांत भाविकाची वाढती संख्या पाहता आयोजक व पणज गा्मस्थानी भाविकाच्या सोयीसाठी चोख व्यवस्था केली आहे याञा महोत्सवा करीता पणज नगरी सज्ज झाली असुन श्री महालक्ष्मी माता दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन समिती व गावकरी मंडळी याच्या वतीने करण्यात आले आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola