अकोट (सारंग काराळे): अकोट शहर पोलिसांनी आठवडी बाजार अकोट येथील देशी विदेशी दारू विक्रीचे दुकान मध्ये चोरी करणाऱ्या चोरट्यास गजाआड करून त्याचे कडून चोरी गेलेले नगदी रू व विदेशी दारु क्वार्टर असा ३८५०/- रु चा माल जप्त केला. प्राप्त माहितीनुसार अरुण कुमार द्वारकालाल जयस्वाल यांचे आठवडी बाजार येथिल देशी विदेशी दारू विक्री दुकानात दि १२/०९/१८ चे रात्रीला कुणीतरी अज्ञात चोरट्याने दुकानचे शटर चे कुलुप तोडुन दुकानात आत प्रवेश करुन दुकानातील इम्पेरीअल ब्लु कंपनीची व्हीस्की विदेशी दारु चे ३५क्वार्टर कि ४९००/- रु व नगदी ५००/- रु असा एकूण ५४००/-रु चा माल चोरुन नेल्याचा पो स्टे ला रिपोर्ट दिल्या वरुन अज्ञात आरोपी विरुध्द अप क्र ३२९/१८ कलम ४५७,३८० भा.द .वि. चा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक श्री गजानन शेळके यांनी गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी यांना गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिल्यावर गोपनीय माहिती वरून अजय नागोराव वैद्य वय ४०वर्ष रा गवळी पुरा अकोट यास अटक करून त्याचे जवळुन चोरलेले I B व्हीस्की २५ क्वार्टर व नगदी ३५०/- रु असा एकूण ३८५०/- रु माल जप्त करून शोध लावला ही कार्यवाही पो नि श्री गजानन शेळके यांचे मार्गदर्शनाखाली डी बी पथकाचे सपोनि श्री.डी .एन .फड पोहेका संजय घायल, गोपाल अघडते ,राकेश राठी,सुलतान पठाण, विजय सोळंके यांनी केली.
अधिक वाचा : वरली मटक्यावर पोलीसाचा छापा एकास अटक
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola