बेलखेड (निलेश अढाऊ) : बेलखेड येथुन दरवर्षी प्रमाणे ऋषीपंचमी निमीत्य बेलखेड ते शेगांव पदयात्रा दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून आज दि.१०/०९/२०१८ ला सकाळी ७ वाजता महादेव संस्थान येथुन जि.प. सदस्य गजानन उंबरकार व सौ. स्वातीताई गजानन उंबरकार यांच्या हस्ते पालखी पूजन करून या दिंडी सोहळ्याला सुरूवात झाली.
या सोहळ्या साठी गावातील महीला, लहान थोर मंडळी, भावीकभक्त तिनशे ते चारशे च्या जवळपास दिंडी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. दिंडी सोहळ्यासाठी ठिकठिकाणी चहा, फराळ, दुपारचे व रात्रीचे जेवन दानदात्याकडून करण्यात येत आहे. रात्री अंदुरा या ठिकाणी दिंडीचे मुक््काम राहील.
या पुर्ण दिंडी सोहळ्यासाठी गावातून वाहन सहकार्य विनामुल्य करण्यात आली तसेच विशेष सहकार्य गजानन उंबरकार, प्रदीप राऊत, बाळू नागपुरे, ब्रम्हदेव येनकर, ब्रम्हदेव तायडे, मुन्ना राऊत, हरिहर राऊत, देविदास इंगळे, बाळु गावत्रे, गजानन डामरे, शिवरामे बंधु, गजानन डिवरे, देवीदास नागपुरे, सुनील गोमासे, अंबादास व्यवहारे, तसेच श्री संत गजानन महाराज भजन मंडळ, सावता मंडळ व समस्त गावकरी भक्त मंडळी आदींचे सहकार्य लाभले.
अधिक वाचा : बघा फोटोज: भांबेरी मध्ये पोळा सन उत्साहात आणि शांततेत साजरा
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola