अकोट (सारंग कराळे): अकोट तालुक्यातील बोर्डी येथील रमेश रामचंद्र खिरकर व देवानंद रमेश खिरकर हे पिता-पुत्र गावातील शांतता भंग करीत असून यांच्या वर्तनाने गावाचे नाव खराब होत आहे.त्यामुळे या दोघांनाही बोर्डी गावातून कायमचे हद्दपार करा अशी मागणी शेकडो ग्रामस्थांनी निवेदनातुन केली आहे.
सर्वत्र पोळा सण साजरा होत असतांना बोर्डी येथील शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थ अकोट एसडीपीओ कार्यालयावर धडकले.खंडनी प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असणाऱ्या रमेश खिरकर, देवानंद खिरकर यांच्यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे, ठाणेदार मिलिंदकुमार बहाकर यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, नागास्वामी महाराजांच्या नांवाने आमचे गाव प्रसिद्ध आहे. आमच्या गावात अनेक शेतकऱ्यांनी विविध उपक्रम राबवून यशस्वी केले.यामुळे बोर्डी गावाच्या नावाची चांगली प्रतिमा तयार झाली.मात्र गावातील रमेश खिरकर व त्याचा मुलगा देवानंद यांनी प्रत्येकांच्या काड्या करून नागरिकांना वैतागून सोडले आहे.
या दोघांनी अनेक मुला-मुलीची चुकीची माहिती देऊन सोयरिका तोडल्या आहेत. तसेच माहिती अधिकाराची धमकी देऊन खंडणी मागतात.गावातील नागरिकांना कोणत्याही प्रकरणात अडकविण्याची धमकी देत पैसे मागतात.या दोघांविरुद्ध तक्रार आहेत.महिला व युवतींना छेड काढणे, पाठलाग करणे असे प्रकार करतात.मात्र भीती पोटी कोणीही यांची तक्रार करीत नाहीत. यांच्यामुळे गावात नेहमीच वाद निर्माण होतात.त्यामुळे शांतता भंग होते. या दोघांच्या प्रतापामुळे गावचे नाव खराब होत आहे. एखादे वेळी यांच्यामुळे गावात दंगल,खून सारखे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दोघांनाही गावातून कायमचे हद्दपार करावे.यापुढे यांच्यामुळे गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला शासन जबाबदार राहील.यावेळी एसडीपीओ सोनवणे यांनी त्या दोघांना तडीपार करण्याचे आश्वसन दिले.तर ठाणेदार बहाकर यांनी कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सर्वाना सांगितले. निवेदनावर शेकडो ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
काय आहे प्रकरण इथे वाचा : बोर्डी येथील पिता-पुत्रा विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल
अधिक वाचा : पोळ्याच्या सणाला बैलाला आंघोळ घालतांना मुलगा धरणात बुडाला
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola