अकोट (सारंग कराळे): अकोट शहर पोलिसांनी दि .०९/सप्टेंबर२०१८ रोजी पोळा व कर उत्सवा निमित्त अकोट शहरात पेट्रोलिंग करीत असताना पोलीसाना मिळालेल्या गुप्त बातमी वरुन अकोला रोडवर श्रीहरी हॉटेल समोर नाकाबंदी केली असता अवैद्यरीत्या विना परवाना देशी दारु मोटारसायकल वर घेऊन जाताना १) विजय उर्फ विक्की नागनाथ पउळ वय ३०वर्ष रा कमिटी फैल अकोट २) सचिन कैलास बोरोडे वय ३२ वर्ष रा हाडोळे प्लॉट नंदीपेठ अकोट यांना पकडून त्यांचे कडून देशी दारुचे १८० ml चे सीलबंद १९२ क्वार्टर कि. ११५२०/- व एक मो सा हिरो होंडा डिलक्स एम एच 30 AL ३३०१ किंमत २५०००,रु असा एकुण ३६५२०- रुपयाचा माल जप्त केला वरुन त्यांच्या विरुध्द पो. स्टे .ला अप नं ३२०/१८ कलम ६५ ई. म .दा .का प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे तसेच दि ०८/सप्टेंबर१८रोजी प्राप्त माहिती नुसार श्रीराम नगर अकोट येथे १) संगीता संजय कुटे यांच्या वर प्रोव्ही रेड करुन त्यांचे कडुन देशी दारुचे १५ क्वार्टर की ९००- रु चा जप्त केला तसेच २) गजानन बाळू वाघमारे यांच्यावर प्रोव्ही रेड करुन देशी दारुचे २० क्वार्टर किंमत १२०० – रु चे जप्त केले त्यांचे वर ६५ ई म प्रोव्ही ऍक्ट प्रमाणे गुन्हे दाखल केले सदर कारवाही पो. नि.गजानन शेळके यांचे मार्गदर्शनाखाली डी बी पथकाचे सपोनि .ज्ञानोबा फड ,पोहेका संजय घायल ,नापोका राकेश राठी ,गोपाल अघडते ,विजय सोळंके पठाण यांनी केली
अधिक वाचा : पोळ्याच्या सणाला बैलाला आंघोळ घालतांना मुलगा धरणात बुडाला
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola