पातुर(सुनील गाडगे) : पातुर येथून जवळच असलेल्या मोर्णा धरणाजवळील खानापूर बीटमधील ई क्लास वर्गाच्या दहा एकरामध्ये सागवानाची तस्करी कण्याचा वन तस्करांचा प्रयत्न वन विभाग्याच्या अधिकारी व कर्मचारयानी हाणून पाडला व दीड लाखाचे सागवान जप्त केले. बुधवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास या ठिकाणी राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेत ७० हजाराचे तर गुरुवारी पुन्हा याच परिसरात राबविण्यात आलेल्या मोहिमेत सुमारे ८० हजाराचे असे एकूण दीड लाखाचे सागवान जप्त करण्यात वन विभागाला यश आले. साग्वानाचे ५० पेक्षा अधिक नग यावेळी जप्त करण्यात आले. पातुर वन विभागाचे परीक्षेत्र अधिकारी मनोज सामदेकर आणि त्यांच्या चमूला खानापूर बीट परीसरात सागवान वृक्षांची कतल करून चोरी करण्यात येत असल्याची माहिती बुधवारी मिळाली.
या माहितीच्या आधारे त्यांनी छापा टाकला, अज्ञात आरोपींनी सागवानाचे नग जागेवरच सोडून पलायन केले. वन विभागाने त्याठीकानाहुन सागवानाचे ७० हजार रुपये किंमतीचे ३१ नग जप्त केले. दरम्यान, गुरुवारीही या बीटमध्ये पुन्हा शोध मोहीम राबविण्यात आली. यावेळी चमूला आणखी सागवानाचे नग कापून ठेवलेल्या स्थितीत आढळले. त्यांनी हे सुमारे ८० हजाराचे सागवान जप्त केले.
दोन दिवसांच्या या कारवाईत सुमारे दीड लाख रुपयांच्या सागवानाची तस्करी रोखण्यात वन विभागाला यश आले.ही कारवाई पातुर वन क्षेत्र सहायक एस. यु. वाघ, बी. आर. कायंदे, एम. डी. वाणी, अविनाश घुगे, एस. पी. राठोड, पी. व्ही. मेश्राम, राजू इनामदार यांनी केली.
अधिक वाचा : विदर्भात गांधी जयंती रोजी आत्मक्लेश उपोषण
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola