भांबेरी(योगेश नायकवाडे): भांबेरी येथील प्रभाग क्रमांक 4 (झोपडपट्टी) मध्ये गेले 20 ते 25 वर्षांपासून रस्ता नाही,त्यामुळे झोपडपट्टीतील ग्रामस्थांनी तहसिलदारांना निवेदन देऊन रस्त्याची मागणी केली. इंदिरा आवास योजनेतून ग्रामस्थांना घरकुल (झोपडपट्टी) मिळाले होते. त्याच झोपडपट्टी मध्ये 25 वर्षांपासून एकदाही रस्ता करण्यात आला नाही असे निवेदनात नमूद आहे. जिल्हा परिषद सर्कल भांबेरीच्या सदस्यांनी दलित वस्ती कॉंक्रीटीकरणासाठी 21 लाखाचा निधी दिला आहे मात्र अधिकारी येथे रस्ते करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे निवेदनात नमूद आहे तसेच निवेदनानुसार तिन दिवसात रस्त्याचे काम सुरु न झाल्यास 3 सप्टेंबरपासून ग्रामपंचायत भांबेरी कार्यालया पुढे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ह्या ग्रामस्थांनी दिला आहे. उपोषण आंदोलनात प्रदीप अहिर, विकास बोदडे, प्रफुल भोजने, सागर भोजने, अजय भोजने, दामू भोजने, दिनेश खंडेराव, अनिल भोजने, नितेश भोजने आदींचा सहभाग राहणार असल्याचे निवेदन ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिले आहे.
अधिक वाचा : सोशल मीडियात व्हायरल होत असलेला बँके बंद राहण्याचा तो मेसेज ‘खोटा’
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola