रशियातील लोकांना भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये ‘क्रॅमलिन पॅलेस’ इथं ‘ फेस्टिवल ऑफ इंडिया ‘चं आयोजन करण्यात येणार आहे. ६ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या फेस्टिवलमध्ये रशियातील २२ प्रमुख शहरांचा सहभाग असणार आहे. या फेस्टिवलमध्ये भारतीय संस्कृतीची खास झलक पाहायला मिळणार असून कथ्थक आणि भरतनाट्यम असे विविध भारतीय नृत्यप्रकार इथं सादर केले जातील.
फेस्टिवलची सुरुवात कथ्थक आणि भरतनाट्यम सारख्या शास्त्रीय नृत्यानं होणार असून जयलक्ष्मी ईश्वर, मौलिक शाह, इशिरा पारेख असे अनेक कलाकार आपली कला सादर करतील. फेस्टिवलमध्ये भारतातील प्रसिद्ध पदार्थ आणि विविध कला यांचं प्रदर्शन भरवण्यात येईल. तसंच, रशियन संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असलेला ‘बेरेझका’ हा नृत्यप्रकार सादर होणार आहे.
तब्बल सहा महिने चालणाऱ्या या ‘इंडियन फेस्टिवल’ची मार्च २०१९मध्ये सांगता होणार असून भारतातील अनेक कलाकार रशियातील प्रमुख शहरांमध्ये आपली कला सादर करतील.
अधिक वाचा : फ्रान्सला मागे टाकत भारताची अर्थव्यवस्था सहाव्या स्थानावर.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola