अकोट(सारंग कराळे)- अकोट शहरा मध्ये पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे नेतृत्वात जननी2 मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली, पोलिस अधीक्षक राकेश कलासागर ह्यांचे संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ह्या मोहिमे अंतर्गत अकोट शहरात वेग वेगळे कार्यक्रम घेण्यात आले होते.
जननी2 मोहीम वर्षभर सुरूच ठेवण्याचा संकल्प पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी केला होता त्या अंतर्गत शहरातील शाळा व महाविद्यलयातून लावण्यात आलेल्या तक्रार पेट्या दर शनिवारी उघडण्यात येतात व त्या मध्ये काही तक्रार असल्यास त्याची नोंद वेगळ्या रजिस्टर मध्ये घेण्यात येऊन तक्रारींचे स्वरूप पाहून व सत्यता पडताळून त्वरित कार्यवाही करण्यात येणार आहे, त्या साठी पोलिस नाईक सुरज निंबाळकर ह्यांचे नेतृत्वात एक पथक तयार करण्यात आले असून हे पथक शाळा महाविद्यलया ना भेटी देऊन त्यांचे सतत संपर्कात राहतात, तसेच शाळा महाविद्यालयात लावण्यात आलेल्या तक्रार पेट्या दर शनिवारी शाळा वयवस्थापणातील व्यक्ती समोर उघडून काही तक्रार असल्यास त्याची नोंद घेऊन उचित कार्यवाही साठी पोलिस निरीक्षक ह्यांचे समोर ठेवण्यात येतात, तक्रार पेट्या लावल्या पासून आज पावेतो एकही तक्रार कोणत्याही तक्रार पेट्या मध्ये मिळून आली नाही, विद्यार्थिनीनि कोणालाही न घाबरता तक्रार देण्या साठी पुढे यावे असे आवाहन पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी केले आहे