अकोट (सारंग कराळे )- अकोट ग्रामीण पोलीस स्टे.अतंर्गत ग्राम पणज परीसरातील अंजनगाव अकोट रोडवरील हिंदु स्मशांनभुमी जवळ पोलीसाना मिळालेल्या गुप्त माहीती वरुन अंजनगाव अकोट रोडवर नाका बंदी केली असता दुपारी २वाजताच्या दरम्यान आरोपी अणिल सुखदेव थोरात वय ३८ रा.दहीगांव रेचे ता.अजंनगाव जि.अमरावती हा त्याची हीरोहोडा पँशन क्र.एम.एच.२७एम.६६९९वर देशी दारु टेंगो पंच चे २००नग व मोटर सायकल कीमंत २००००रु असा एकुण २६०००रु मुद्देमाल पचांसमक्ष जप्त करुन त्याच्यावर क.६५ई.म.प्रोअँक्ट प्रमाणे कारवाई करण्यात आली असुन सदरची कारवाई मा.श्री.सुनिल सोनोने साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट पोलीस निरीक्षक मिलींदकुमार बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनुराधा पाटेखेडे,ए.एस.आय.श्रीकुष्ण गावडे ना.पो.कॉ.महेश श्रीवास यांनी केली .