तेल्हारा(शुभम सोनटक्के)- तालुक्यातील पाथर्डी ग्राम पंचायत सरपंच व पोलीस पाटील यांनी तंटामुक्ती अध्यक्ष निवडीकरिता सभा बोलावली मात्र सभा सुरू होताच त्या मध्ये तंटा सुरू झाल्याने मारहाणीचा प्रकार या सभेत घडला.तंटा करणाऱ्या दोघांविरुध्द आज दुपारी तेल्हारा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले.
गावातील तंटा गावातच मिटवला गेला पाहिजे यासाठी शासनाने महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून तंटा मुक्ती अध्यक्षांची निवड केली जाते.काल पाथर्डी येथे तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षाची निवड करण्यासाठी सभा बोलावली होती.सभा सुरू झाली पोलिस पाटील यांनी सूचना दिल्या यावेळी सभेला निमंत्रक म्हणून चापाणेर चे पोलीस पाटील विनोद दबडगाव यांनी सभेत बोलण्यास सुरुवात केली असता गावातील मिलिंद मनोहर कुकडे व अमोल मनोहर कुकडे ह्या दोघांनी उभे राहून तंटा करण्यास सुरुवात केली चापाणेर च्या पोलिस पाटलांनी आमच्या गावात बोलू नये असे म्हणून चापणेर च्या पोलिस पाटलाच्या अंगावर धावून मारहाण करण्यास सुरुवात केली व त्यांच्या हातातील मोबाईल घेऊन पाथर्डीच्या पोलीस पाटील विजया प्रशांत शेंगोकार यांना मोबाइल मारून फेकला.याप्रकरणी शासकीय कामात अडथळा व मारहाण केल्याप्रकरणी सदर तंटा करणाऱ्या दोघांविरिद्ध कलम ३५३,३२३,३४ नुसार पोलीस पाटील पाथर्डी यांच्या फिर्यादी वरून दाखल करण्यात आला.पुढील तपास तेल्हारा पोलिस करीत आहेत.