तेल्हारा(प्रतिनिधी)-लोकजागर मंचचे संस्थापक अनिल गावंडे यांच्या कल्पनेतून व पुढाकाराने तसेच पुरुषोत्तम आवारे,ऍड. सुधाकर खुमकर, गजानन बोरोकर,गोपाल जळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली आकोट व तेल्हारा तालुक्यातील 80 गावातील 100 शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी बारामतीला रवाना झाले.
हे शेतकरी त्या परिसरातील पिकं, पीकपद्धती, आधुनिक नवीन तंत्रज्ञान इ.गोष्टी जाणून घेणार आहेत शिवाय उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्याचे उत्पन्न कसे वाढेल,पाण्याचे नियोजन कसे करावे,फळबागांची लागवड व जोपासना कशी करावी इ.विषयी या शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे.
आपल्या आकोट व तेल्हारा परिसरात कसदार जमीन व मुबलक पाणी असूनसुद्धा आपल्याकडील शेतकरी कर्जबाजारीच आहे,त्याची प्रगती थांबली आहे आणि हळूहळू तो आत्महत्येकडे वळतो आहे त्या शेतकऱ्याला या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठीच हा शेतकरी दौरा आयोजित केल्याची प्रतिक्रीया लोकजागर मंचचे संस्थापक अनिलभाऊ गावंडे यांनी व्यक्त केली.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola