अंदुरा(प्रतिनिधी)– बहुचर्चित आसिफ खान हत्या प्रकरणी जिल्हा पोलिस प्रशासनाला अद्याप पर्यन्त आसिफ खान याचा मृतदेह सापडला नसून संत गाडगेबाबा आपत्कालीन पथक आज अंदुरा येथील पूर्णा नदीमध्ये दाखल झाले असून आज दुपार पासून आसिफ खान यांचा मृतदेहाचा शोध घेत वागरगाव पर्यन्त शोध घेतला जाणार आहे.
संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाकडून वेगवेगळ्या ठिकाणी पूर्णा नदीमध्ये शोध घेतला जात असून आज दुपारी पथक दाखल झाले असता यावेळी स्वतः तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास देवरे,बिट जमादार खिल्लारे,पो कॉ गजानन राठोड ,पो कॉ ठोसर यांच्या सह तेल्हारा पोलीस शोध घेत आहेत.