१० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी दमदार कामगिरी करत दोन पदकांची कमाई केली. अवघ्या १६ वर्षाच्या सौरभ चौधरी ने सुवर्ण पदक पटकावत विक्रम केला. तर, अभिषेक वर्माने कांस्य पदक पटकावले.
यंदाच्या एशियन्स गेम्समध्ये सौरभने भारतासाठी तिसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली. १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम आठजणांमध्ये सौरभ आणि अभिषेकने स्थान मिळवले होते. सातत्यपूर्ण कामगिरी करताना सौरभ अंतिम तीन स्पर्धकांमध्ये दुसऱ्या स्थानी होता. अखेर मोक्याच्या क्षणी सौरभने जपानच्या स्पर्धकावर निर्णायक गुण आघाडी मिळवली. रोमाचंक झालेल्या अंतिम फेरीत अखेरच्या शॉटमध्ये सौरभने सुवर्ण पदकाचा वेध घेतला.
सौरभ चौधरीने २४०.७ गुणांची कमाई करत सुवर्ण पदक पटकावत एशियन्स गेम्समध्ये विक्रम रचला. तर, अभिषेक वर्माने २१९.३ गुणांची कमाई करत कांस्य पदक पटकावले.
अधिक वाचा : Asian Games 2018 : विनेश फोगट – ‘एशियाड सुवर्ण’ जिंकणारी भारताची पहिलीच महिला कुस्तीगीर