अकोला – मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारण्याचा व्यापक कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. त्या अनुषंगाने आज मराठा समाजाच्या विदयार्थ्यांसाठी शासकीय अध्यापक महाविदयालयातील वसतिगृह व सेमिनार हॉलचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हापरिषद अध्यक्षा संध्याताई वाघोडे, पोलीस अधिक्षक एम. राकेश कलासागर , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ , निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चौहाण, शासकीय अध्यापक महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मानेकर, माजी प्राचार्य डॉ. शांताराम बुटे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अशोक पटोकार, पंकज जायले, गोपी अण्णा चाकर, डॉ. अभय पाटील , संदीप पाटील , श्रीकांत ढगेकर, राम मुळे, युवराज गांवडे, इंदूताई देशमुख, अभिजीत मोरे, सुधाकर खुमकर, शरद झामरे , डॉ. अशोक ओळंबे, गोपी ठाकरे, मनोहर हरणे, मधुकर देशमुख, श्री. जाणोरकर यांची उपस्थित होती.
शासनाने मराठा समाजातील विदयार्थ्यांसाठी वसतीगृह उभारण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी अकोल्यात आजपासून होत आहे. वसतिगृहाच्या माध्यमातून समाजातील आर्थिक दुर्बल व मागासवर्गीय विदयार्थ्यांसाठी राहण्याची सोय करण्यात आली आहे, असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले की, नवीन वसतिगृहाचे बांधकाम होईपर्यंत शासकीय अध्यापक महाविदयालयातील वसतीगृह मराठा समाजातील विदयार्थ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. येथे 40 मुली-मुलींना राहण्याच्या सोईबरोबरच या ठिकाणी स्वतंत्र अभ्यासिका, स्पर्धा परिक्षा केंद्र, वाचनालय तसेच जिमची व्यवस्था जिल्हा नियोजनच्या नाविण्यपूर्ण योजनेतून करुन देण्यात येणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शासकीय अध्यापक महाविदयालयात 42 लक्ष रुपये खर्च करुन सेमिनार हॉल बांधण्यात आलेला आहे. या सेमिनार हॉलचे उदघाटनही पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या सेमिनार हॉलमध्ये सुसज्ज अशी अभ्यासिका उभारण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजनचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.
तरूण-तरुणींना विविध व्यवसाय – उद्योगासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 10 लाख रूपयांपर्यंतच्या कर्जास शासनाने हमी दिली असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील म्हणाले की, या कर्जाचे व्याज शासनामार्फत भरले जाणार असल्याने आता तरुणांना बँकांमार्फत तात्काळ कर्ज उपलब्ध होईल, याच लाभ तरुणांनी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा जास्तीत जास्त प्रचार होण्याकरीता दि. 18 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून या कार्यशाळेस मोठया संख्येने विदयार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.
अधिक वाचा : अकोला जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाकडून सर्वतापरी सहकार्य – पालकमंत्री
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola