अकोट (सारंग कराळे): अकोट येथे सकल मराठा मोर्चाच्या वतीने अकोट बदंला उस्फुर्त प्रतीसाद देत व्यापारी संघटनांनी स्वयंफुर्तीने बंद ठेवुन पाठीबा दर्शविला तसेच बहुजन क्रांर्ती मोर्चा अकोला यांनी सुद्धा अकोट बंदला व मराठा आरक्षणाला जाहीर पाठींबा दिला बंद, विशेष म्हणजे दरम्यान कुठेच अनुचित प्रकार घडला नाही. अकोट शहरातील सर्व शाळा कॉलेज बस सेवा ,खाजगी वाहतुक,पेट्रोल पंप सुद्धा पुर्णपणे बंद होते तसेच मार्केट बंद असल्यामुळे सर्वीकडे शुकशुकाट पसरला होता. तसेच आदोंलकानी शिवाजी महाराज चौकामधे रोडवर ठिय्यां आदोंलन करत एक मराठा लाख मराठाच्या घोषाणानी संपुर्ण परीसर दणानुन सोडला होता.
रोडवर ठिय्या देत असताना दोन रुग्णवाहीकांना रस्ता मोकळा करुन देत आदोलंकानी पुन्हा सवेंदनशिलतेचा परीचय दिला तसेच या बंद दरम्यान एक आगळा वेगळा व अनोखा विवाह पार पडला तो म्हणजे आदोलंकाचा बंद सर्मथन देत शिवाजी महाराज चौकातच रोडवरच नवरदेव अभिमन्यु पाडुरंग अढाऊ रा.गांधीग्राम व नवरी तेजस्विनी हरीदास गावंडे रा.देऊळगाव (गावंडे) या नववधु वराचा विवाह पार पडला हा अनोखा विवाह चर्चेचा विषय बनला होता, त्यानतंर आदोलंकाना अकोट शहर पोलीस स्टेशन मधे नेऊन स्थानबंद करण्यात आले नतंर सोडुन देण्यात आले यावेळी पोलीस अधीक्षक एम .राकेश कलासागर व उपविभागिय पोलीस अधिकारी सुनिल सोनोने याच्या मार्गदर्शानाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री गजानन शेळके,अकोट गा्मिणचे पोलीस निरीक्षक मिलींदकुमार बाहकर एपीआय फळ तसेच अकोट शहर डी.बी.पथक व गोपीनिय विभागाचे कर्मचार्यासह अकोट शहराचे पोलीस निरीक्षक श्री गजानन शेळके यांनी कडेकोड बदोबंस्त ठेवला होता.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola