अकोट (सारंग कराळे)- शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भगवा सप्ताहाचे अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.त्यानिमित्त आकोट महिला आघाडीच्या वतीने वृक्षारोपणच्या कार्यक्रमाचे आयोजन मा दिवकरजी रावतेसाहेब,खा.अरविंदजी सावंत साहेब,मा गोपिकीशनजी बाजोरिया साहेब ,महिला आघाडी संपर्क प्रमुख मा मधुराताई देसाई,सहसंपर्क प्रमुख श्री श्रीरंगदादा पिंजरकर,सहसंपर्क प्रमुख मा ज्योत्स्नाताई चोरे यांच्या मार्गदर्शनत व जिल्हाप्रमुख मा नितीनबापूं देशमुख व जिल्हा संघटिका प्रा माया म्हैसने याच्या नेतृत्वात करण्यात आले.आकोट महिला आघाडीच्या शहर संघटिकाश्रीमती नर्मदा काहार,व उपशहर संघटिका यांनी वृक्षरोपनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
सर्वप्रथम प्रमुख अतिथीम्हणून लाभलेल्या शिवसेना महीला जिल्हा संघटीका प्रा.मायाताई म्हैसने यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे पुजन करण्यात आले त्या नंतर अंजनगाव रोड, व टाकपूरा या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी उपस्थिती म्हणून लाभलेले शिवसेना महीला ता संघटीका साै गिरनाळे ताई,शहर संघटिका(पूर्व)सौ भारती नाठे, तसेच माया माेहीते, चित्रा पाजाळे ,रमा पाजाळे, संगिता ढाेले,धनवंती हेडाऊ,मयुरी कहार,नर्मदा कहार ,गायत्री कहार,मंजु कहार,सरला गाैर मंदा पवार,विमला गौर,भावना हेडाऊ तसेच असंख्य महीला उपस्थित हाेत्या